logo

मतदान जन जागृती करिता शहरातून प्रभातफेरी.

मतदान जन जागृती करिता शहरातून प्रभातफेरी.

परतुर प्रतिनिधी :-
भाऊसाहेब पाटील मुके -

परभणी लोकसभेचे मतदान दोन दिवसावर येऊन ठेपलेले आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आज ज्ञानलता पब्लिक स्कूल, परतूर च्या वतीने मतदान जन-जागृती करिता परतूर शहरात प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीची सुरुवात रेल्वे गेट पासून समाजसेवक श्री. मनोहरजी खालापुरे व डॉ. संदीप चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. तर समारोप तहसील कार्यालय येथे करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!,
वोट द्यायला जायचे आहे, आपले कर्तव्य बजवायचे आहे!,
वृद्ध असो किंवा जवान, सर्वजण अवश्य करा मतदान!,
जना मनाचा पुकार, मतदान आपला अधिकार !,
भ्रष्टाचार मुळापासून घालूया, योग्य उमेदवार निवडूया!,
सत्य आणि इमानदारीने, सरकार बनेल मतदानाने !
आधी घोषणा देऊन शहर दनाणून टाकले होते.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

11
834 views